स्थापना: या संस्थेची स्थापना दि. ३०.१०. १९३२ म्हणजेच संवत १९८१च्या कार्तिक शुद्ध प्रतिपदाच्या शुभदिनी करण्यात आली होती. तेव्हा संस्थेचे नाव "श्री महागुजरात मंडळ" होते. हि संस्था १९५६ पासून “श्री पंचवटी एज्युकेशन सोसायटी" या नावाने ओळखली जाते. आता हि संस्था पंचवटीच्या सर्वे नंबर १३४ मध्ये सुमारे 3४,000 चौरसवार (सात एकर) जमीनीवर उमारलेली आहे. ज्यात शैक्षणिक संस्था आणि वाचनालय चालवले जाते.