SHREE PANCHAVATI EDUCATION SOCIETY

संस्थेचा इतिहास

Set a plan, start learning and
unlock your potential

स्थापना: या संस्थेची स्थापना दि. ३०.१०. १९३२ म्हणजेच संवत १९८१ च्या कार्तिक शुद्ध प्रतिपदाच्या शुभदिनी करण्यात आली होती. तेव्हा संस्थेचे नाव "श्री महागुजरात मंडळ" होते. हि संस्था १९५६ पासून “श्री पंचवटी एज्युकेशन सोसायटी" या नावाने ओळखली जाते. आता हि संस्था पंचवटीच्या सर्वे नंबर १३४ मध्ये सुमारे 3४,000 चौरसवार (सात एकर) जमीनीवर उभारली आहे. ज्यात शैक्षणिक संस्था आणि वाचनालय चालवले जाते.
उद्देश: गुजराती माध्यमातून नाशिकमधील गुजराती समाजातील मुलांसाठी मातृभाषेतून शिक्षण मिळावे या हेतूने संस्थेची स्थापना करण्यात आली होती. संस्था सदर उद्देशाला आज सुध्दा धरून आहे व शैक्षणिक संस्थांचे यशस्वीरित्या संचालन करीत आहे.तसेच गुजराती समाज बांधवांचा सामाजिक आर्थिक व सांस्कृतिक प्रगती व प्रोत्साहन हेतुने संस्था कार्यरत आहे.
विकास: सन १९३४ मध्ये "कुमार मंदीर" नावाने प्रथम शाळा सुरू करण्यात आली होती. हि शाळा इयत्ता चौथीपर्यंत होती व ४० विद्यार्थी दाखल झालेले होते या आधी समाजातील बालकांना मराठी माध्यमातून शिक्षण घ्यावे लागत होते.
आणि १९४८ मध्ये शेठ श्री. प्रागजीभाई मावजीभाई तर्फे संस्थेस दान मिळाले त्यांची मुलगी स्व. गोदावरीबेनच्या स्मरणार्थ कुमार मंदीर प्राथमिक शाळेला "श्री गोदावरीबाई प्राथमिक शाळा" नाव देण्यात आले.
इयत्ता चौथी पर्यंत सुरू केलेली शाळा पुढे इयत्ता सातवी पर्यंत झाली व मेट्रीक पर्यंत पोहोचली परंतु संस्थेला शाळेसाठी इमारत व इमारती साठी जागेची आवश्कता होती.
स्व. शेठ श्री. लिलाधर मोरारजी भीमाणी यांनी जागा भेट दिली व स्व. शेठ श्री. जयंतीलाल विक्रमचंद संघवी यांनी इमारतीसाठी पाया बांधकाम करून दिले. शेठ श्री. रामरिखदास परशराम पुरिया यांच्या नावानी दान मिळाले त्यातून हायस्कूलची इमारत तयार करण्यात आली व त्या इमारतीस “शेठ श्री. रामरिखदास परशराम पुरिया विद्यालय" नाव देण्यात आले.
सन १९४९ मध्ये संस्थेचे त्यावेळचे ट्रस्टी शेठ श्री.दुर्लभजीभाई केशवजी खेताणी यांचे कडून त्यांचा मुलगा निरंजनच्या स्मरणार्थे उदार दान मिळाले त्यामधून बालमंदीरची स्थापना झाली आणि त्यांना “श्री निरंजन खेताणी बालमंदिर" नाव देण्यात आले.
सन १९५३ मध्ये राजमाता चमन कुंवरबा आणि स्व.राजकुमारी आनंद कुंवरबा यांचे नावांनी "महिला शिवण क्लास" ची शुरूवात झाली.
गुजराती हायस्कुलच्या इमारत फंड करिता सन १९६३ माटुंगा मुंबईच्या सण्मुखानंद हॉलमध्ये "सो टचनुं सोनुं" या नाटकाचा चेरिटी शो आयोजित करण्यात आला होता त्यातून आणि शेठ कुंवरजी मावजी ट्रस्ट कडून उदार दात्यांनी संस्थेला दानाच्या रकमेतून सन १९६७ मध्ये "शेठ श्री. रामरिखदास परशुराम पुरिया" विद्यालयची भव्य इमारत साकारण्यात आली या इमारतीत असलेल्या सभागृहाला "कुंवरजी मावजी ऑडिटोरियम" नाव देण्यात आले.
दि. 30 ऑक्टोबर १९७६ या दिवशी संस्थेच्या प्रांगणात सरदार वल्लभभाई पटेल याची कांस्याच्या अर्धप्रतिमेचा अनावरण विधी त्यावेळचे महाराष्ट्र राज्याचे पुरवठा मंत्री श्री.जगेशभाई देसाई यांचे शुभहस्ते करण्यात आले व संस्था शैक्षणिक संकुलास "सरदार श्री वल्लभभाई पटेल विद्यानगर" नाव देण्यात आले.
समाजातील अनेक बालक इंग्रजी माध्यमाच्या मिशनरी शाळांमध्ये जात असल्याचे समजले आपल्या संस्कृतीचे संस्कार जोपासले जावे व बालकांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळावे या हेतुने सन १९७६ मध्ये इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्यात आली.
सन १९८३ मध्ये पटेल मणिकबेन अंबालाल पटेल तर्फ संस्थेस दान मिळाले. त्यातून इंग्रजी माध्यम शाळेस "श्री अंबालाल प्रेमजी पटेल हायस्कुल" नाव देण्यात आले.
श्री.अल्केशभाई खोडिदास पटेल यांचे नावे संगणक विभागाची स्थापना करण्यात आली व त्यास "श्री.अल्केशभाई खोडिदास पटेल" नाव देण्यात आले.
दि. ९ नोव्हेंबर १९८३ ‘पांडव पंचमीचे' दिवशी "श्री किकाखुशाल पुस्तकालय" ची स्थापना करण्यात आली. सदर नावासाठी श्री किकाखुशाल ट्रस्टचे " छगन भुवन" इमारत विक्रीतून मिळालेली रक्कम संस्थेस दान म्हणून मिळाली.
सन १९८५ मध्ये श्री. हरिभाई देसाई यांचकडून संस्थेला दान मिळाले त्यातून इंग्रजी माध्यम शाळेच्या बालमंदिरास "श्री. हरिभाई देसाई मोन्टेसरी स्कुल" नाव देण्यात आले.
सन २००३ मध्ये स्व.बाबुभाई कापडिया यांचे नावाने दान मिळाले व त्यातून प्रायमरी स्कूलची स्थापना करण्यात आली व सदर प्रायमरी स्कुलला "श्रीमान बाबुभाई कापडिया इंग्लिश मिडियम प्रायमरी स्कूल" असे नाव देण्यात आले.
श्री. विजयभाई व श्री. उपेन्द्रभाई दिनानी यांचे तर्फे ज्युनियर सायन्स आणि कॉलेज साठी दान मिळाले व त्यास “निर्मलाबेन जमनादास दिनानी ज्युनियर कॉलेज" असे नाव देण्यात आले.
श्री. राजेशभाई पोपटलाल ठक्कर यांचेकडून इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी करिता दान दिला. त्यास "श्रीमती नर्मदाबेन पोपटलाल ठक्कर इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी" असे नाव देण्यात आले.

श्री पंचवटी एज्युकेशन सोसायटी संचलित
• शेठ. श्री रामरिखदास परशराम पुरिया विद्यालय
• श्री. गोदावरीबाई प्राथमिक शाळा
• श्री. निरंजन खेताणी बालमंदिर
• श्री. अंबालाल प्रेमजी पटेल इंग्लिश मिडीयम हायस्कूल
• श्रीमान बाबुभाई कापडिया इंग्लिश मिडीयम प्रायमरी स्कूल
• प्रेमिलाबेन भालचंद्र शाह नर्सरी स्कूल
• श्री. हरिभाई देसाई मोन्टेसरी स्कुल
• श्री. अल्केशकुमार खोडिदास पटेल कॉम्युटर अॅकेडमी
• एन अॅन्ड जे दिनानी ज्युनियर कॉलेज सायन्स अॅन्ड कोमर्स
• श्रीमती नर्मदाबेन पोपटलाल ठक्कर इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी

संस्था संचलित सर्व शाळा व कॉलेजची विशेषता
• बालमंदिर ते इयत्ता १० पर्यंत गुजराती सेमी इंग्रेजी माध्यमातून शिक्षण
• आर. पी. विद्यालय व ए. पी. पटेल शाळेच्या माजी विद्यार्थ्या करिता कॉलेज प्रवेशासाठी विशेष सवलत (संस्थेच्या कॉलेजमध्ये)
• अद्ययावत एल. सी. डी. प्रोजेक्टर थिएटर
• खेळासाठी विशेष मार्गदर्शन
• बालमंदिर बालकांसाठी स्वतंत्र बगिचा
• प्रशस्त कीडागण तसेच इनडोअर खेळांसाठी सुविधा
• केन्टिन, प्रशस्त पुस्तकालय, मध्यवती रंगमंच
• स्वच्छतेसाठी विशेष हाऊस किपींग टीम
• पौष्टिक आहार, अल्पोपहार, मध्याहन भोजन
• सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक व राष्ट्रीय सण साजरे केले जातात
• एस. एस. सी. १०० % निकाल
• बस व्यवस्था, खेळणी घर, सी. सी. टी. व्ही कॅमेरा
• १५० कॉम्युटर असलेली अद्ययावत कॉम्युटर लॅब व सायन्स लॅब
• वानप्रस्थ क्लब, ग्रीन जिम
• सुरक्षा व्यवस्था
• पिण्यासाठी शुद्ध पाणी